Maharashtra State Council Of Examinations, Pune

National Means Cum Merit Scholarship Scheme Examination 20 Nov 2016 Result
   
निवड प्रक्रीया:
  1. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे.
  2. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
  3. तसेच संबंधित संवर्गात अपंगासाठी ३% आरक्षण समाविष्ट आहे.
  4. सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ. ८ वी ची विध्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे.
  5. केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालय सेकंडरी स्कॉलरशिप विभागामार्फत सर्व राज्यांच्या नोडल ऑफिसर्स यांना (महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) जा.क्र.१-१०/२०१०-५५ दि. ०९ सप्टेंबर २०१५ अन्वये पाठविण्यात आलेल्या पत्रान्वये केंद्रीय विद्यालय तसेच जवाहर नवोदय विद्यालय आणि शासकीय व खाजगी शाळेतील शासनाच्या वसतिगृहाची सवलत घेणाऱ्या विध्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
  6. प्रत्येक जिल्ह्यासाठीचा कोटा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येतो.
            १) प्रथम गुणानुक्रमे सर्वसाधारण (General) संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते. उत्तीर्णतेसाठी ४०% गुण आवश्यक आहेत.
            २) उर्वरित ८ मागासवर्गीय संवर्ग तसेच सर्व अपंग विध्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण होण्यासाठी ३२% गुण आवश्यक आहेत.
            ३) त्यानंतर गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांची त्या त्या (८) विशेष संवर्गातील विध्यार्थ्यांच्या यादीत समावेश केला जातो.
            ४) विशेष संवर्गातील यादी करताना त्या संवर्गातील सर्वसाधारण यादीत आलेल्या विध्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही.
            ५) अपंगासाठी ३% आरक्षण सर्व आठ संवर्गासाठी देण्यात येते.अस्थिव्यंग (Orthopedic disable), कर्णभधीर (Hearing disable), दृष्टिदोष (Visually disable) /अंध (Blind ) या प्रत्येकी प्रवर्गासाठी १% आरक्षण सतंत्रपणे देण्यात आले आहे.
            ६. अपंगासाठीचे आरक्षण निश्चित करताना त्या संवर्गात अगोदर उपलब्ध विध्यार्थी संख्येचा विचार करण्यात येतो. ३% आरक्षण पूर्तता होत नसेल तर गुणवत्ता यादीतील आवश्यक तेवढ्या शेवटच्या क्रमांकाच्या ऐवजी अपंग आरक्षण संधी गुणानुक्रमे असणाऱ्या विध्यार्थ्यांना दिली जाते.
            ७.सर्वसाधारण वर्गामध्ये अस्थिव्यंग (Orthopedic disable), कर्णभधीर (Hearing disable), दृष्टिदोष (Visually disable) /अंध (Blind ) यातून समान विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच उर्वरित विध्यार्थी जास्तीत जास्त गुण असलेला पुढचा गुणानुक्रमे अपंग विध्यार्थी निवडला जातो.
            ८. एकूण २ अपंग विद्यार्थ्यांची निवड करताना वेगवेगळ्या ३ प्रवर्ग गटातील गुणानुक्रमे २ आलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
  1. शेवटच्या दोन किंवा अधिक विध्यार्थ्यांना सारखे गुण असल्यास खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येतो.
            १) ज्यांचे गुण MAT विषयामध्ये जास्त आहेत असा विध्यार्थी
            २) ज्यांचे गुण SAT विषयातील गणित या विषयात जास्त आहेत असा विध्यार्थी
            ३) SAT मधील गणित विषयात समानगुण असल्यास विज्ञान मधील जास्त गुण आसणाऱ्यास प्राधान्य
            ४) SAT मधील गणित व विज्ञान या विषयात समानगुण असल्यास ज्याचे वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यास प्राधान्य
            5) विद्यार्थ्यांचे वय समान असल्यास आडनावाच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार. आडनाव नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार सर्वात शेवटी करण्यात येतो.
            ६) मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) मध्यवर्ती इमारत, पुणे -१. यांच्यामार्फत निवड झालेल्या विध्यार्थाना शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.

Enter Correct Seat Number
 
Enter Candidate Seat No. (12 digits) or
Enter Candidate School Code (7 digits) or

DistrictWise/CasteWise Selected List