Maharashtra State Council Of Examinations, Pune
National Talent Search Examination Nov-2015
उपरोक्त याद्या मंगळवार दि . १५ .०३.२०१६ रोजी दु. ३.०० वाजता परिषदेच्या संकेत स्थळावर घोषित करण्यात येत आहेत.
 १) निवड झालेल्या विध्यार्थ्यांना या कार्यालयामार्फत स्वतंत्ररीत्या त्यांचे शाळेत काळवीण्यात येइल.
 २) राष्ट्रीयस्तर परीक्षा दि.८  मे २०१६ रोजी होणार आहे. सदर परीक्षेची प्रवेशपत्रे एन.सी. ई.आर.टी. नवी दिल्ली यांचेमार्फत पाठविण्यात येतील.
 ३) विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची सत्य प्रत हवी असल्यास प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी रु. १०० /- चा डी.डी.सादर केल्यावर देण्यात येईल .सदरचा डी .डी आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे - यांचे नावे काढण्यात यावा .यासाठी सदरचा डी .डी . दि.२३-३-२०१६ पर्यंत या कार्यालयास मिळणे आवश्यक आहे .त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही .सदर मागणीपत्रासोबत विद्यार्थ्याने त्याच्या प्रवेशपत्राची सत्यप्रत जोडावी
 ४ )आरक्षित संवर्ग /अपंगत्व आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांचे बाबतीत सदरची निवड यादी तात्पुरत्या स्वरुपाची असून संबंधित विद्यार्थ्यांनी जातीच्या प्रमाणपत्राच्या व अपंग प्रमाणपत्राच्या सत्यप्रती NCERT New Delhi यांना प्रवेशपत्रासोबत परीक्षा केंद्रावर सदर केल्यानंतरच त्यांची निवड अंतिम समजण्यात येईल या कार्यालयास सादर केल्यावरच त्यांची निवड अंतिम समजण्यात येईल.
 ५ )राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेसाठी निवड होण्यासाठी फक्त सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी (GMAT)आणि शालेय क्षमता चाचणी (SAT) या दोन विषयांच्या गुणांची बेरीज ग्राह्य धरण्यात आलेली आहे. भाषा चाचणी (LANGUAGE TESTING) या विषयाचे गुण फक्त पात्रतेसाठी आहेत